Top News

सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण मागे; केंद्र सरकारकडून तीन प्रमुख मागण्या मान्य, पण ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलनावर ठाम

नवी दिल्ली:

गेल्या महिनाभरापासून देशाचे राजकारण आणि शिक्षण क्षेत्र ढवळून काढणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाला अखेर गुरुवारी मध्यरात्री एक मोठे वळण मिळाले. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलग २६ दिवसांच्या उपोषणानंतर अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे.


सोनम वांगचुक

मध्यरात्री १.३० वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात जाऊन वांगचुक यांची भेट घेतली. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या तीन प्रमुख मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र वाचून दाखवल्यानंतर वांगचुक यांनी लिंबू पाणी पिऊन उपोषण सोडले.


मात्र, सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले, तरी दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे शांत झालेले नाही. NEET घोटाळ्याविरोधात रस्तावर उतरलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असून, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


मध्यरात्री रुग्णालयात नाट्यमय घडामोडी


सलग २६ दिवस अन्न-त्याग केल्यामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. डॉक्टरांचा सल्ला आणि न्यायालयाच्या सूचनेनुसार दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाही वांगचुक यांनी आपला लढा सुरूच ठेवला होता. देशातील ६५ हून अधिक खासदारांनी त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.


गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन वांगचुक यांच्याशी चर्चा केली. नड्डा यांनी स्वतः केंद्र सरकारचे पत्र वाचून दाखवले. या निर्णयानंतर वांगचुक यांनी ‘एक्स’ 


(ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले:


"केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह आणि लडाखच्या ॲपेक्स बॉडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत मी माझे २६ दिवसांचे उपोषण संपवले आहे. या कठीण काळात पाठीशी उभ्या राहिलेल्या देशातील खासदारांचे आणि नागरिकांचे मी आभार मानतो."


केंद्र सरकारने मान्य केलेल्या ३ मोठ्या अटी


विद्यार्थ्यांचा वाढता रोष आणि वांगचुक यांची बिघडत चाललेली प्रकृती पाहता केंद्र सरकारने बॅकफूटवर येत पुढील अटी मान्य केल्या आहेत:


विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे: २० जुलै रोजी संसदेवर शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यावर किंवा आंदोलकावर पोलीस कारवाई किंवा गुन्हा दाखल केला जाणार नाही.


 संसदेत विशेष चर्चा: NEET पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर आगामी संसदीय अधिवेशनात सविस्तर चर्चा केली जाईल.

 

बाधित कुटुंबांना भरपाई : पेपरफुटीच्या मानसिक त्रासातून ज्या विद्यार्थ्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबांना आर्थिक भरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल.


‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलनावर ठाम


एकीकडे वागचुक यांनी उपोषण सोडले असले, तरी जंतर-मंतरवर ठाण मांडून बसलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) अजूनही मागे हटायला तयार नाही. संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी वागचुक यांच्या निर्णयाचे स्वागत केले, पण आंदोलन चालूच राहील असे स्पष्ट केले.


अभिजीत दीपके म्हणाले:


सोनम वागचुक सरांनी उपोषण सोडल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण देशाचा विवेक जागृत केला. मात्र, आमची लढाई अजून संपलेली नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर-मंतरवरील आमचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.


मुंबईत पडसाद अन् विरोधकांचा आक्रमक पवित्रा


या आंदोलनाचे पडसाद आता संपूर्ण देशात उमटू लागले आहेत. मुंबईत विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या गाड्या अडवून जोरदार निदर्शने केली.

 

विरोधकांची निदर्शने: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या अनेक खासदारांनी दिल्लीत गांधी स्मृती स्थळावर एकत्र येत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. "देशातील तरुणांच्या भविष्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि ही लढाई अशीच सुरू राहील," असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

 

सलमान खानची मध्यस्थी: याच दरम्यान बॉलीवूड अभिनेता सलमान खान यानेही आंदोलक विद्यार्थ्यांना शांततेचे आवाहन केले. सोनम वांगचुक यांच्यासाठी घरचा डबा पाठवण्याची इच्छा व्यक्त करत त्याने विद्यार्थ्यांना घरी परतण्याची विनंती केली.


पुढे काय?


सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांसमोर झुकावे लागले असले, तरी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी धरून ठेवल्यामुळे जंतर-मंतरवरील राजकीय पारा चढलेलाच आहे. येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात या NEET पेपरफुटी प्रकरणावर काय निर्णय होतो आणि शिक्षण व्यवस्थेत काय बदल केले जातात, याकडे संपूर्ण देशातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.


अभिजित दिपके

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने